Wednesday 17 September 2008

कसे सरतील सये..

कसे सरतील सये, माझ्याविना दिस तुझे, सरताना आणि सांग सलतील ना?
गुलाबाची फुलं दोन, रोज रात्री डोळ्यांवर, मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?

पावसाच्या धारा धारा, मोजताना दिस सारा, रिते रिते मन तुझे उरे,
ओठभर हसे हसे, उरातून वेडेपिसे, खोल खोल कोण आत झुरे?
आता ज़रा अळीमिळी, तुझी माझी व्यथा निळी,सोसताना सुखावून हसशील ना?

कोण तुझ्या सौन्धातुन उभे असे सामसूम चिडीचुप सुनसान दिवा,
आता सांज ढळेलच, आणि पुन्हा छळेलच, नभातुन गोरा चांदवा,
चांदण्यांचे कोटी कण, आठवांचे ओले सण, रोज रोज निजभर भरतील ना?

इथे दूर देशी माझ्या सुन्या खिडकीच्यापाशी, झडे सर काचभर तडा,
तूच तूच, तुझ्या तुझ्या, तुझी तुझी, तुझे तुझे, सारा सारा तुझा तुझा सडा,
पड़े माझ्या वाटेतून, आणि मग काट्यातुन, जातानाही पायभर मखमल ना?

आता नाही बोलायाचे, ज़रा ज़रा जगायाचे, माळुनिया अबोलीची फुले,
देहभर हलु देत, विजेवर झुलु देत, तुझ्या माझ्या विरहाचे झुले,
ज़रा घन झुरू दे ना, वारा गुदमरु दे ना, तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना॥