Sunday 20 December 2009

सागरा प्राण तळमळला

ने मजसी ने, परत मातृभूमीला|
सागरा प्राण तळमळला ||धृ||

भूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहिला होता |
मज वदलासी, अन्य देशी चाल जाऊ, सृष्टीची विविधता पाहू ||
ताई जननी हृद विरहशंकीतही झाले, परी तुवा वाचन तिज दिधले |
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठी वाहीन, त्वरीत या परत आणीन |
विश्वसलो या ताव वचनी मी, जगदानुभावे योगे बनुनी मी |
तव अधिक शकत उद्धरणी मी ||
येईन त्वरे, कथुनि सोडिले तिजला ||१||

शुक पंजरी वा हरीण शिरावापाशी, ही फसगत झाली तैशी |
भूविरह कसा, सतत साहू या पुढती, दशदिशा तमोमय होती ||
गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे |
जरी उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा ||
ती आम्रवृक्षवत्सलता, रे.. नवकुसुमायुता त्या सुलता, रे |
तो बालगुलाब ही आता, रे ||
फुलबाग मला, हाय, पारखा झाला ||२||

नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा, मज भरतभूमिचा तारा |
प्रासाद इथे भव्य परी मज भारी, आईची झोपडी प्यारी ||
तिजवीण नको राज्य मज प्रिय साचा, वनवास तिच्या जरी वाणीचा |
भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहु जिवलग गमते चित्ता रे |
तुझ सरिस्पते ती सरिता रे ||
तद्विरहाची शपथ घालितो तुझला ||३||

या फेनमिषे हससि निर्दया कैसा, का वाचन भंगिसी ऐसा |
तत्स्वमित्वा सांप्रत जी मिरवते, म्हणुनी का आम्ग्लाभूमी ते ||
मन्मातेला अबला म्हणुनी फसविशी, मज विवासनाते देशी |
तरी आंग्लभूमी भयभीता रे, अबला न माझीही माता रे |
कथिल हे अगस्तीस आता रे ||
जो आचमनी एक क्षणी तुज प्याला ||४||

Friday 3 October 2008

पाऊस असा रुणझुणता..

पाऊस असा रुणझुणता, पैंजणे सखीची स्मरली,
पाऊल भिजत जाताना, चाहूल विरत गेलेली ||ध्रु||

ओलेत्याने दरवळले, अस्वस्थ फुलांचे घोस,
ओलांडून आला गंध, नि:स्तब्ध मनाची वेस ||१||

पाऊस सोहळा झाला, कोसळत्या आठवणींचा,
कधी उधाणता अन केव्हा थेम्बांच्या संथ लयीचा,
पाऊस असा रुणझुणता, पैंजणे सखीची स्मरली,
पाऊल भिजत जाताना, चाहूल विरत गेलेली ||२||

नभ नको नको म्हणताना, पाऊस कशाने आला,
गात्रांतून स्वच्छंदी अन, अंतरात घुसमटलेला ||३||

Wednesday 17 September 2008

कसे सरतील सये..

कसे सरतील सये, माझ्याविना दिस तुझे, सरताना आणि सांग सलतील ना?
गुलाबाची फुलं दोन, रोज रात्री डोळ्यांवर, मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?

पावसाच्या धारा धारा, मोजताना दिस सारा, रिते रिते मन तुझे उरे,
ओठभर हसे हसे, उरातून वेडेपिसे, खोल खोल कोण आत झुरे?
आता ज़रा अळीमिळी, तुझी माझी व्यथा निळी,सोसताना सुखावून हसशील ना?

कोण तुझ्या सौन्धातुन उभे असे सामसूम चिडीचुप सुनसान दिवा,
आता सांज ढळेलच, आणि पुन्हा छळेलच, नभातुन गोरा चांदवा,
चांदण्यांचे कोटी कण, आठवांचे ओले सण, रोज रोज निजभर भरतील ना?

इथे दूर देशी माझ्या सुन्या खिडकीच्यापाशी, झडे सर काचभर तडा,
तूच तूच, तुझ्या तुझ्या, तुझी तुझी, तुझे तुझे, सारा सारा तुझा तुझा सडा,
पड़े माझ्या वाटेतून, आणि मग काट्यातुन, जातानाही पायभर मखमल ना?

आता नाही बोलायाचे, ज़रा ज़रा जगायाचे, माळुनिया अबोलीची फुले,
देहभर हलु देत, विजेवर झुलु देत, तुझ्या माझ्या विरहाचे झुले,
ज़रा घन झुरू दे ना, वारा गुदमरु दे ना, तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना॥

Thursday 3 July 2008

वादळवाट..

थोडी सागर निळाई, थोडे शंख नि शिंपले,
कधी चांदणे टिपुर तुझ्या डोळ्यात वाचले,
कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात,
स्वप्नपाखरांचा थवा विसावला ओंजळीत,
कधी काळोख विझला, कधी विझली पहाट,
हुंकारला नदीकाठ, कधी हरवली वाट,
वार्यापावसाची गाज, काळी भासतच दाट,
कधी धूसर धूसर एक वादळाचि वाट

Wednesday 2 July 2008

राणी माझ्या मळ्यामदि घुसशील काय..

डिपारी डिपांग, डिचिपारी डिपांग, इडीपारी डिचीपारी डिपांग

काळी माती, निळं पाणी, हिरवं शिवार,
ताज्या ताज्या माळव्याचा भुईला ह्या भार,
ज्वानिच्या या मळ्यामदि पिरतीचं पाणी,
बघायला कवतिक आलं नाही कुणी,
मळ्य़ाला ला मळेवाली भेटलीच न्हाय,
अगं राणी माझ्या मळ्यामदि घुसशील काय?

काकडिचा बांधा तुझा, मिरचीचा तोरा,
मुळ्य़ावानी कडू तरी, रंग गोरा गोरा,
लिम्बावानी कांति तुझी, बीटावानी वठ,
टंबाट्य़ाचे गाल तुझे, भिंडीवानि बोटं,
काळजात मंडई तू मांडशील काय,
अगं राणी माझ्या मळ्यामदि घुसशील काय?

( ------ अवधूतने गायलेल्या गाण्यातलं कडवं ----
नको दावू भाजीवाल्या फुकाचा रुबाब,
भाजी तुझी वर ताज़ी, आतून ख़राब,
गोड गोड बोलशील, पाडशिल फशी,
भाजी तुझी पाटीमंदी घेवू तरी कशी,
आजकाल कुणाचाबी भरवसा नाय,
अगं राणी माझ्या मळ्यामदि घुसशील काय? )

( ------ सलीलने गायलेल्या गाण्यातले कडवं ----
नको गाऊ भाजीवाल्या पिरतीची गाणी,
शिळ्य़ा शिळ्य़ा भाजीवर शिंपडुन पाणी,
ओसाडश्या गावी तुझा ओसाडसा मळा,
गुलाबाला सोसवना उन्हाळ्याच्या झळा,
स्ट्रोबेरीला कांदा कधी शोभणार न्हाय,
अरे अरे..राणी माझ्या मळ्यामदि घुसशील काय? )

तुज्यासाठी शिवाराची केलि मशागत,
खुरपला जीव दिलं काळजाचं ख़त,
राखायला मळा केली जिवाचिया वात,
बुजगावन्याचा परी उभा दिन-रात,
नको जळु दिन-रात, नको जीव टांगु,
ठाव हाय मला सारं, नको काही सांगू,
पिरतीत राजा तुज्या नाही काही खोड,
तुज्या हाती मिरचीबी लागतिया गोड,
माज्यासंग मळा तुझा कसशील काय?
अगं राणी माझ्या मळ्यामदि घुसशील काय?

अजून उजाडत नाही गं..

अजून उजाडत नाही गं, नाही गं॥

दशकांमागुन सरली दशके
अन् शतकांच्या गाथा गं,
ना वाटांचा मोह सुटे, वा
ना मोहाच्या वाटा गं,
पथ चकव्याचा गोल सरळ वा
कुणास उमगत नाही गं,
प्रवास कसला फ़रफ़ट अवघी,
पान जळातुन वाही गं॥

कधी वाटते दिवस-रात्र हे
नसते काही असले गं,
त्यांच्या लेखी रात्र सदाची
ज्यांचे डोळे मिटले गं,
स्पर्ष आंधळे, गंध आंधळे
भवताली वनराई गं,
तमातली भेसूर शांतता
कानी कुजन नाही गं॥

एकाच पळभर एखादी कळ
अशी सणाणून जाते गं,
क्षणात विरती अवघे पडदे
लक्ख काही चमचमते गं,
ती कळ सरते, हुरहुर उरते,
अन् पिकण्याची घाई गं,
वर वर सारे शिंपण काही
आतून उमलत नाही गं॥

अताशा असे हे..

अताशा असे हे मला काय होते?
कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते
बरा बोलता बोलता स्तब्ध होतो
कशी शांतता शून्य शब्दात येते

कधी दाटू येता पसारा घनांचा
कसा सावळा रंग होतो मनाचा
असे हालते आत हळुवार काही
जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा

असा ऐकू येतो क्षणांचा इशारा
क्षणी दूर होतो दिशांचा पसारा
नभातून ज्या रोज जातो बुडोनी
नभाशीच त्या मागू जातो किनारा

अंदाज कुठले, अवधान काही
कुठे जायचे यायचे भान नाही
जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा
कुठले नकाशे, अनुमान काही

कशी ही अवस्था कुणाला कळावे ?
कुणाला पुसावे ? कुणी उत्तरावे ?
किती खोल जातो तरी तोल जातो
असा तोल जाता कुणी सावरावे ?