Wednesday 2 July 2008

राणी माझ्या मळ्यामदि घुसशील काय..

डिपारी डिपांग, डिचिपारी डिपांग, इडीपारी डिचीपारी डिपांग

काळी माती, निळं पाणी, हिरवं शिवार,
ताज्या ताज्या माळव्याचा भुईला ह्या भार,
ज्वानिच्या या मळ्यामदि पिरतीचं पाणी,
बघायला कवतिक आलं नाही कुणी,
मळ्य़ाला ला मळेवाली भेटलीच न्हाय,
अगं राणी माझ्या मळ्यामदि घुसशील काय?

काकडिचा बांधा तुझा, मिरचीचा तोरा,
मुळ्य़ावानी कडू तरी, रंग गोरा गोरा,
लिम्बावानी कांति तुझी, बीटावानी वठ,
टंबाट्य़ाचे गाल तुझे, भिंडीवानि बोटं,
काळजात मंडई तू मांडशील काय,
अगं राणी माझ्या मळ्यामदि घुसशील काय?

( ------ अवधूतने गायलेल्या गाण्यातलं कडवं ----
नको दावू भाजीवाल्या फुकाचा रुबाब,
भाजी तुझी वर ताज़ी, आतून ख़राब,
गोड गोड बोलशील, पाडशिल फशी,
भाजी तुझी पाटीमंदी घेवू तरी कशी,
आजकाल कुणाचाबी भरवसा नाय,
अगं राणी माझ्या मळ्यामदि घुसशील काय? )

( ------ सलीलने गायलेल्या गाण्यातले कडवं ----
नको गाऊ भाजीवाल्या पिरतीची गाणी,
शिळ्य़ा शिळ्य़ा भाजीवर शिंपडुन पाणी,
ओसाडश्या गावी तुझा ओसाडसा मळा,
गुलाबाला सोसवना उन्हाळ्याच्या झळा,
स्ट्रोबेरीला कांदा कधी शोभणार न्हाय,
अरे अरे..राणी माझ्या मळ्यामदि घुसशील काय? )

तुज्यासाठी शिवाराची केलि मशागत,
खुरपला जीव दिलं काळजाचं ख़त,
राखायला मळा केली जिवाचिया वात,
बुजगावन्याचा परी उभा दिन-रात,
नको जळु दिन-रात, नको जीव टांगु,
ठाव हाय मला सारं, नको काही सांगू,
पिरतीत राजा तुज्या नाही काही खोड,
तुज्या हाती मिरचीबी लागतिया गोड,
माज्यासंग मळा तुझा कसशील काय?
अगं राणी माझ्या मळ्यामदि घुसशील काय?

No comments: